वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

शोकवावा म्या देहे ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-079119 · अभंग क्र. १४८१

1481.
शोकवावा म्या देहे । ऐसे नेणो पोटी आहे ॥१॥
तरीच नेदा जी उत्तर । दुःखी राखिले अंतर ॥धृपद॥
जावे वनांतरा । येणे उद्देशे दातारा ॥२॥
तुका म्हणे गिरी । मज सेववावी दरी ॥३॥

अर्थ :
देवा मी माझ्या देहाला खूप त्रास द्यावे असे तुम्हाला वाटत आहे की काय हे मला काही कळत नाही. मी तुम्हाला इतक्या वेळा हाक मारतो तरीदेखील तुम्ही माझ्याकडे साधे पहात देखील नाही. पण तुम्ही एक लक्षात ठेवा देवा त्यामुळे माझ्या अंतःकरणाला खूप दुःख होते आहे, देवा मी कंटाळून वनात निघून जावे या उद्देशाने तर तुम्ही माझ्याशी बोलत नाही ना ? तुकाराम महाराज म्हणतात नाही तर ट मी एखाद्या पर्वताच्या दरी मध्ये जाऊन राहावे असे तुम्हाला वाटत आहे काय ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग