वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

संतांसी क्षोभवी कोण्

🙏 3. संत तुकाराम · ABH-079066 · अभंग क्र. १४७९

1479.
संतांसी क्षोभवी कोण्या ही प्रकारे । त्याचे नव्हे बरे उभयलोकी ॥१॥
देवाचा तो वैरी शत्रु दावेदार । पृथ्वी ही थार नेदी तया ॥धृपद॥
संतांपाशी ज्याचा नुरेचि विश्वास । त्याचे जाले दोष बळीवंत ॥२॥
तुका म्हणे क्षीर वासराच्या अंगे । किंवा धावे लागे विषमे मारू ॥३॥

अर्थ :
जो संतांना कोणत्याही कारणावरून त्रास देतो त्यांचे उभय लोकात चांगले होणार नाही. असा मनुष्य देवाचाही दावेदार आहे व त्याला पृथ्वी देखील आश्रय देत नाही. ज्यांचा संतांच्या बोलण्यावर विश्वास नाही त्यांचे पाप बलाढ्य आहे असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात जसे गाईचे दूध काढण्याकरिता तिचे वासरू पुढे आणावे लागते नाहीतर गाय मारण्याचा धावते, त्याप्रमाणे जर संतांचा आदर केला तर तेव्हाच देव, भगवंत आपल्यावर प्रसन्न होतो नाहीतर जो संतांचा आदर करत नाही त्यांचे देव उभय लोकांमध्ये कल्याण होऊ देत नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग