तापत्रयअग्निची जळतसे
1474.
तापत्रयअग्निची जळतसे सगडी आहाळोनि कोरडी जाली काया ॥१॥
केव्हा करुणाघना वोळसी अंबरी | निवविसी नरहरी कृपादृष्टी ॥२॥
शोकमोहाचिया झळंबलो जाळी | क्रोधाचे काजळी पोळतसे ॥३॥
चितेचा वोणवा लागला चहूंकडा | प्राण होय व्याकुळा धांव देवा ॥४॥
धावाधाव करुणाघना तुजविण | नामा म्हणे प्राण जातो माझा ॥५॥
