सर्वभावे तूते जे ध्य
1493.
सर्वभावे तूते जे ध्याती दातारा | त्यांचिया संसारा तूंचि होसी ॥१॥
ज्याचे चित्ती नाही आणिक कांही काम | त्याचा योगक्षेम तूंचि होसी ॥२॥
ऐहिक परत्र जे कांही देखिजे | ते तुवा होईजे मायबापा ॥३॥
नामा म्हणे माझी भक्ति है माउली | केशवा बाहिली क्षणमात्रे ॥४॥
