येईल तुझ्या नामा । ल
1482.
येईल तुझ्या नामा । लाज म्हणू पुरुषोत्तमा ॥१॥
धीर राहिलो धरूनि । त्रास उपजला मनी ॥धृपद॥
जगा कथा नांव । निराशेने नुपजे भाव ॥२॥
तुम्ही साक्षी की गा । तुका म्हणे पांडुरंगा ॥३॥
अर्थ :
हे पुरुषोत्तमा केंव्हा तरी तुला तुझ्या नावाची लाज वाटेल आणि केंव्हा तरी तू माझा उद्धार करशीलच. मी धीर धरून राहिलो आहे नाहीतर माझे मन फार त्रासलेले आहे. सर्वत्र हरिकथा करतो आहे व सांगतो आहे की हरीकथा ही भवनदीतून तारणारी नौका आहे. पण माझ्यासारखी तू सर्वाची निराशा केलीस तर देवा लोकाचा भक्तीभाव तुझ्या विषयी कसा वाढणार ? तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा मी जे काही बोलत आहे हे खरे आहे की खोटे आहे याला तूच साक्षी आहेस.
