लोभियाचे घरी लटिकेचि
1473.
लोभियाचे घरी लटिकेचि उपवास न मरे हृषिकेश म्हणती जगी ॥१॥
तू तंव भावाचा अंकुर जी देवा | लटिका मी पहावा दास तुझा ॥२॥
लटिकी पक्षियाते बोभाये कुंटणी | ते त्वा माझी म्हणोनि अंगिकारिली ॥३॥
लटिका अजामेळ पुत्राचेनि मोहे | सोडविला पाहे कैसा तुवा ॥४॥
त्या अवघ्याहुनि मी लटिका सहस्र गुणे | तारूनि कीर्ति करणे म्हणे नामा ॥५॥
