वैष्णवाघरी देव सुखाव
1486.
वैष्णवाघरी देव सुखावला । बाहिर नवजे दवडोनि घातिला ॥१॥
देव म्हणे माझे पुरतसें कोड । संगती गोड या वैष्णावांची ॥२॥
जरी देव नेउनी घातिला दुरी । परतोनि पाहे तंव घराभीतरीं ॥३॥
कीर्तनाची देवा आवडी मोठी । एका जनार्दनी पडली मिठी ॥४॥
