गाजी परमानंदु मानसी
1476.
गाजी परमानंदु मानसी । संत भेटतां सुखराशी । कीर्तने तारिले सर्वांसी । विठ्ठल नामस्मरणें ॥१॥
धन्य धन्य विठ्ठल मंत्र । सोपा तीन अक्षरीं पवित्र । काळिकाळ उघडोनि नेत्र । पाहू न शके जयासी ॥२॥
एका जनार्दनी उघडोनि नेत्र । पाहुं न कीर्तने प्राप्त सर्व स्थिती । जयजय रामकृष्ण म्हणती । ते तरती कालीमाजीं ॥३॥
