चरणी ठेउनि माथा संता
1475.
चरणी ठेउनि माथा संतांसी पूजावें । उगेंचि ऐकावे हरिकीर्तन ॥१॥
कलीमाजी श्रेष्ठ कलीमाजी श्रेष्ठ । कीर्तन बोभाटें पळती दोष ॥२॥
न लगे नाना युक्ती व्युप्तत्तीचें वर्म । हरीचें कीर्तन सोपे बहु ॥३॥
योगयागादिक नोहें यथासांग । तेणे होय भंग सर्व कर्मां ॥४॥
एका जनार्दनी धरुनि विश्वास । जाई तू संतांस शरण सुखें ॥५॥
