वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 185. नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार

तुझिया संतांची अंगसं

🙏 4. संत नामदेव · ABH-082432 · अभंग क्र. १४९२

1492.
तुझिया संतांची अंगसंगति | ते शिणलिया विश्रांति संसारिया ॥१॥
श्रवण कीर्तन ध्यान घडे अनायासे भेदभ्रम नासे तेचि क्षणी ॥२॥
ऐसे भाग्य मज देसी कवणे काळी | होईन पायधुळी वैष्णवांची ॥३॥
वदनी तुझे नाम वसे निरंतर राखीन त्याचे द्वार थोर आशा ॥४॥
येता जाता मज करिती सावधान | वदनी कृष्ण कृष्ण म्हणविती ॥५॥
कामधेनु घरी असे प्रसवली | ते विकावया नेली दैवहते ॥६॥
पंथी पडिला पाया लागे चिंतामणी | पाषाण म्हणऊनि उपेक्षिला ॥७॥
तैसी परी मज जाहली अधमा | चुकलो तुझ्या वर्मा केशिराजा ॥८॥
नामा म्हणे थोर खंती वाटे जीवा कृपा करूनि ठेवा कर माथा ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग