वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

मागील ते आटी येणे घड

🙏 3. संत तुकाराम · ABH-079058 · अभंग क्र. १४७६

1476.
मागील ते आटी येणे घडे सांग । सुतविल अंग एका सूत्रे ॥१॥
पहिपाहुणेर ते सोहळ्यापुरते । तेथुनि आरते उपचार ते ॥धृपद॥
आवश्यक तेथे आगळा आदर । चाली थोडे फार संपादते ॥२॥
तुका म्हणे ॠण फिटे एके घडी । अलभ्य ते जोडी हाता आल्या ॥३॥

अर्थ :
ज्या वेळी हरी व मी एकच सूत्रात ओवले जाऊ त्यावेळी मी मागे केलेले अध्यात्मिक प्रयत्न यशस्वी झाले असे समजेन. पाहुणे हे केवळ सुखसोहळा पुरतेच असतात. परंतु हरीच्या सुखापुढे सर्वकाही कमीच आहे. या कारणामुळे हरीच्या ठिकाणी आदर ठेवावा त्यामुळे अध्यात्मिक मार्ग थोडा सोपा होईल. तुकाराम महाराज म्हणतात हरी सारखा अलभ्य लाभ हातात आल्यानंतर सर्व लाभ आपोआप नाहीसे होतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग