वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 185. नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार

येता जाता थोर कष्टलो

🙏 4. संत नामदेव · ABH-082444 · अभंग क्र. १४८३

1483.
येता जाता थोर कष्टलो गर्भवासी | पडिलो गा उपवासी प्रेमेंविण ॥१॥
बहुतांचा सेवक जालो काकुळती | न पाये विश्रांती तयाचेनी ॥२॥
ऐसे माझे मन शिणले नानापरी | घालीन आभारी संताचिया ॥३॥
वियोगे संतांच्या व्याकुळ चिंतातुर | हिंडे दारोदार दीनरूपे ॥४॥
परि कोणी संतांच्या न घालिती चरणी | तळमळी अनुदिनी अश्रांत सदा ॥५॥
माझे माझे म्हणोनि जया घाली मिठी | दिसे तेचि दिठी नाही होय ॥६॥
तया शोकानळे संतप्त भांबोळे गेले ते न मिळे कवाकाळी ॥७॥
न देखत ठायी देखावया धांवे | भ्रांती भुलले भावे नानामार्गी ॥८॥
तुझा स्वरूपानंदु नाही वोळखिला | जाली ते विठ्ठला हानि थोर ॥९॥
लोहाचा कवळु लागला परिसाते | पढिये सर्वांते होय जेवी ॥१०॥
नामा म्हणे तैसी भेटी संतचरणी | करूनि त्रिभुवनी होईन सरता ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग