संत आधी देव मग । हाच
1490.
संत आधी देव मग । हाचि उगम आणा मना ॥१॥
देव निगुर्ण संत सगुण । म्हणोनि महिमान देवासी ॥२॥
नाम रुप अचिंत्य जाण । संती सगुण वर्णिलें ॥३॥
मुळी अलक्ष लक्षा नये । संतीं सोय दाविली ॥४॥
एका जनार्दनी संत थोर । देव निर्धार धाकुला ॥५॥
