ज्या सुखाकारणें देव
1485.
ज्या सुखाकारणें देव वेडावला । वैकुंठ सांडुनीं संतसदनीं राहिला ॥१॥
धन्य धन्य संतांचे सदन । जेथे लक्ष्मीसहित शोभे नारायण ॥२॥
सर्व सुखांची सुखराशी । संतचरणी भुक्तिमुक्ति दासी ॥३॥
एका जनार्दनी पार नाही सुखा । म्हणोनि देव भुलले देखा ॥४॥
