देवाचे सोईरे संत रे
1492.
देवाचे सोईरे संत रे जाणावें । यापरते जीवे नाठवी कोणा ॥१॥
पडता संकट आठवितसे संता । त्याहुनी वारिता नाही दुजा ॥२॥
म्हणोनि घरटी फिरे तया गांवी । सुदर्शनादि मिरवी आयुधे हाती ॥३॥
लाडिकें डिंगर वैष्णव ते साचे । एका जनार्दनी त्याचे वंदी पाय ॥४॥
