लटिका तरी गाईन तुझें
1470.
लटिका तरी गाईन तुझेंचि नाम | लटिके तरी प्रेम आणीन तुझे ॥१॥
सहजचि लटिके असे माझे ठायी | तुझिया पालट नाही साचपण ॥२॥
लटिके तरी हरी करी तुझे ध्यान | लटिके माझे मन तुजचि चिती ॥३॥
लटिके तरी बैसे संतांचे संगती | दृढ धरीन चित्ती नाम तुझे ॥४॥
लटिका तरी तुझा म्हणविन दास | धरीन विश्वास नामी तुझे ॥५॥
लटिके माझे मन सुफळ करी देवा | नामा म्हणे केशवा विनती माझी ॥६॥
