वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 57. राम सहवास - अभंग ९३७ ते ९४४

अंगे येऊनिया रामे नव

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085470 · अभंग क्र. ९४३

943.
अंगे येऊनिया रामे नवल पै केले भवाब्धी बांधिली सेतु । अतिशयेसी जड दगड तैसे मुढ नामेंचि तारितु ।
अविश्वासिया तेथे मार्गचि न कळे स्वेतबंधी भवें आवर्तु रया ॥१॥
रामी आरामु त्या संसार समु अभिमानियां तोचि पशु ।
अंतरी बोध नाही बाहेरी ज्ञातेपण लटक्याचा न घेती त्रासु ॥धृ.॥
सर्वातरीं राम म्हणोनि बोलती परी बोला ऐसी नाहींस्थिती ।
चरणी लागल्या शीळा उद्धारल्या हे तव रायाची ख्याती ।
तेंचि रामु हृदयी अविश्वासें नरका जाती रया ॥२॥
राम म्हणता गणिका उद्धरिली सरला संसारलेशु । सकळ शास्त्र मंथुनि श्रुति वाखणितां नये चित्तींचा विश्वासु ।
वेश्यें निपटा रे वाचुनियां जालो मी नुरेचि संसारपाशु रया ॥३॥
अंतरी रामनाम सांगती कानी परी न सांगती वेदध्वनीं । वेदांचा विश्वासु कर्म प्रकृति परी राम तारिल निर्वाणीं ।
तोचि राम जीता विश्वासे भजाल तरी सेवक होईल निदानी ॥४॥
सांडोनि अभिमान विश्वासे भजाल तरी स्वयोंचि व्हाल राम । मातीयेची मूर्ति द्रोण करुनिया की लौकिका फावला भावो ।
एका जनार्दनी एकपणे भजता संसारासी नुरे ठावो रया ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग