वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › १०, पाईक अभंग ९३३ ते ९३८

देह दंडुनी पाईक अनुस

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074724 · अभंग क्र. ९३७

937.
देह दंडुनी पाईक अनुसरला जीवे ।
तव स्वामियाचे गूज हातासी आले ॥१॥
पाईकपणे गेले स्वामी होउनी ठेले ।
परी नाही विसरले स्वामियाते ॥२॥
पाईकपण ऐसा आठवुचि नाही ।
स्वामीवांचुनी काही जाणेचीना ॥३॥
बापरखुमादेविवरू विठोजी उदारू ।
पाईक तो साचारू स्वामी केला ॥४॥

अर्थ :
भगवद्भक्त देहाला कष्ट देऊन जीवाभावाने भगवंताची सेवा करतात. म्हणूनच तो भगवान त्यांच्या हाती येतो. म्हणजे ते भक्त भगवत्स्वरूप होतात. ते भक्त जरी भगवत्स्वरूप झाले तरी देह असेपर्यंत आपण त्या भगवंताचे सेवक आहोत हे ते विसरत नाहीत. 'मीचि होऊनि पांडवा । करिती माझी सेवा ॥' या प्रमाणे ते सेवा करितच असतात. अशी जरी सेवा करीत असले तरी त्यांच्याठिकाणी आपण सेवक आहोत अशा तऱ्हेचा अभिमान राहात नाही. कारण ते एका भगवंताशिवाय दुसरे काही जाणत नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनाच मी खरा स्वामी केला. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग