वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

तंव ते जगन्माता म्हण

🙏 4. संत नामदेव · ABH-081568 · अभंग क्र. ९३७

937.
तंव ते जगन्माता म्हणे जी कृपावंता | कर्ता करविता कोण याचा ॥१॥
हा तुमचा दास आहे अंतरंग | काय या उद्वेग करणे असे ॥२॥
सर्व भार याचा लागे चालवणे | ऋणवई केंले येणे जन्मोजन्मी ॥३॥
तुम्हापरते यासी जिवलग सोयरे | कोण आहेत दुसरे लोभापर ॥४॥
दृढ चरण धरोनि राहिला अंतरी | जालासे अधिकारी सर्वस्वाचा ॥५॥
जन्मोनिया येणे जोडिले जे कांही | तितुके तुमच्या पायी निक्षेपिले ॥६॥
म्हणोनि याचे कोड करावे परिपूर्ण | व्हावे पै उत्तीर्ण ऋणियाचे ॥७॥
मायबापे याची सखी जिवलग | सांडोनि तुमचा संग धरिला सुखे ॥८॥
म्हणोनि याचे हित लागे विचारावे | उचित करावे देवराया ॥९॥
आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा | करणे हे गोपाळा ब्रीद तुमचे ॥१०॥
रुक्माई म्हणे हा भाग्यवंत नामा | न कळे याचा प्रेमा नित्य नवा ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग