वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

जातीचे हे शिंपी विश्

🙏 4. संत नामदेव · ABH-081624 · अभंग क्र. ९४६

946.
जातीचे हे शिंपी विश्‍व जाणे याते | प्रत्यक्ष सांगाते जेवविले ॥१॥
उच्छिष्ट निजमुखी स्वीकारिले याचे | उरले ते तुम्हा कैचे क्रियाकम॑ ॥२॥
न कळे हा निर्धार भ्रांति वाटे आम्हा | काय तुमचा नामा अंगभूत ॥३॥
नवल हे आवडी लौकिका वेगळी | बुडविले सकळी समूळ धमम ॥४॥
कोणा लोभे तुम्हा लावियेला चाळा | कृपेचा कळवळा निरोपमु ॥५॥
विचारिता तुम्ही आहा वेषधारी | लीला वोडंबरी दिसे तुमची ॥६॥
|वर्णाश्रमधर्म न दिसे तुमच्या ठायी | निर्धारचि कांही न कळे आम्हा ॥७॥
वंद्य निद्य तुम्हा न दिसेचि कोणी | दृष्टी दुजेपणी न पडे तुमची ॥८॥
विश्व आपरूप दिसे तुम्हा सर्व | नेणवे हे माव ब्रह्मांदिका ॥९॥
आम्ही विश्‍वासलो वरवेषा तुमच्या | परी भाव अंतरींचा न कळे कांही ॥१०॥
आपुले स्वहित देखोनि आपण | पाप अथवा पुण्य विचाराव ॥११॥
स्वभावे करुनि विधीते पाळावे | सर्वी सांभाळावे वेदवचन ॥१२९॥
वर्णा्रमपरत्वे बोलिले जे धम्म | ते ते विहितकर्म आचरावे ॥१३॥
स्वामींचे वचन स्वामींनी पाळावे | यश मिरवावे उभयलोकी ॥॥१४॥
तरी हा तुमचा जिवलग नामा | निर्धारिता आम्हा कळो आले ॥१५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग