वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 57. राम सहवास - अभंग ९३७ ते ९४४

अवतरला श्रीराम परब्र

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085467 · अभंग क्र. ९४०

940.
अवतरला श्रीराम परब्रह्मा पुतळा । सुहास्य मुख सुंदर कांसे पितांबर पिवळा ॥१॥
दशरथनंदन रामपाहतां वो मनी ध्याता । देहबुद्धी हरपली डोळे भरी पहाता ॥२॥
वसिष्ठ गुरुंनींआध्यात्माचा रस बिंबविला । ताटिका समुळ मर्दुनी याग रक्षिला ॥३॥
त्र्यंबक धनुष्य भंगुनीं जनकदुहिता आणिसी । कैकयीवरदें दशरथ निमाला श्रीराम गेले वनवासी ॥४॥
येवोनियां वनी रावणे केले जानकीहरण । सीताविरहे राम आलिंगी वृक्ष पाषाण ॥५॥
वाली वधुनी सुग्रीवा दिली किष्किंदा नगरी । सीताशुद्धी करुनी आला वानर केसरी ॥६॥
सेतुबंधन करुनी सुवेळी आला श्रीराम । राक्षसांसहित रावणा दिले निजधाम ॥७॥
बिभीषण स्थापिला आणिली जनकनंदिनी । सीतेसह राम बैसले पुष्पक विमानी ॥८॥
आला श्रीराम सकळा आनंद झाला । भरतभेटीसमयी राम हृदयी गहिंवरला ॥९॥
राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न वामांगी सीता । सिंहासनी बैसविलें वोवाळिलें रघुनाथा ॥१०॥
झाला जयजयकार आनंदें पिटिली टाळी । एका जनार्दनी नाचती आनंदें सकळीं ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग