निर्गुण चवाळे आणिले
952.
निर्गुण चवाळे आणिले ।
बापनिवृत्तीने मज पांघुरविले ॥१॥
चौघे चाऱ्ही पदर म्हणीतले ।
पांघुरण झाले सारासार ॥२॥
बापरखुमादेविवरे विठ्ठले ।
माझे चोरूनी जिणे उघडे केले गे माय ॥३॥
अर्थ :
बाप म्हणजे धन्य धन्य श्रीगुरूनिवृत्तीरायांनी निर्गुण घोंगडे म्हणजे निर्गुण परमात्म्याचे पांघरूण आणिले आणि मला पांघरविले. चौघे चारी पदर म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण हे ज्याचे पदर आहे. तेच सारासार विचारांने निर्गुण पांघरूण झाले. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यानीे माझ्या या चार देहांत असलेले जिणे नाहीसे करून उघडे केले. म्हणजे परमात्मरूप केले. असे माऊली सांगतात.
