सांगेन ते हित धरा अव
944.
सांगेन ते हित धरा अवघे मनी ।
नका मानू कोणी वीट याचा ॥१॥
बरे शिकविता बरे ते माना
वाईटा त्यागावे त्यागविता ॥२॥
पुढे सुख विश्रांती मागे राहे कीर्ति ।
ऐशिया पध्दति संताचिया ॥३॥
निळा म्हणे देवे बोलविले बोल ।
ध्याल ते ते व्हाल सुखी तुम्ही ॥४॥
