वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 57. राम सहवास - अभंग ९३७ ते ९४४

दोघें शरणागत आले श्र

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085469 · अभंग क्र. ९३९

939.
दोघें शरणागत आले श्रीरामासी । मारिले वालीसी एका बाणे ॥१॥
बाणलीसे भक्ति अंगदाचे अंगी । श्रीरामे वोसंगीं धरियेले ॥२॥
धरियेले हातें तारा सुग्रीवानें । वैराचे खंडण झाले तेव्हा ॥३॥
तेव्हा वानरांचीं बोलावली सेना । लंकेवरी ज्यांना पाठविले ॥४॥
विळब न होता धाडी हनुमंता । जाळियेली वार्तां सीता सांगे ॥५॥
सांग लंकाजळी सन्निधा उदधी । लंघुनियां शुद्धि रामा सांगे ॥६॥
सांगे रामा तेव्हा बांधवा सागर । आणुनि अपार पर्वतांसी ॥७॥
शिळासेतु रामचरणाची ख्याती । तारुनी पुढती ख्याती केली ॥८॥
बांधोनिया सेतु राम आला लंके । मारियेलें मुख्य राक्षसासी ॥९॥
मारी कुंभकर्ण इंद्रजित रावणा । होता लक्ष्मणा शक्तिपात ॥१०॥
आणियला गिरी दिव्य तो द्रोणादी । उठविली मादी वानरांची ॥११॥
शिरे उडविली लंकापतीचीं । मुख्य राक्षस साचे छेदियेलें ॥१२॥
लिगाड तोडिले वैरत्व खुटलें । लंकाराज्य दिले बिभीषणा ॥१३॥
तोडियली बेडी नवग्रहं सोडी । उभविली गुढी रामराज्य ॥१४॥
इंद्रचंद्रपद ब्रह्मीयांचे । देउनी तयांचें सुखी केले ॥१५॥
केले समाधान आणविली सीता । अयोध्ये मागुता राम आला ॥१६॥
आलासे भरत लागला चरणी । फिटली पारणी लोचनांची ॥१७॥
चिंता दुःख द्वेष पळाले बाहेरी । एका जनार्दनी करी राज्य सुखें ॥१८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग