पदप्राप्ति - अभंग ९३
936.
पदप्राप्ति - अभंग ९३६
अहिरावणे राम धरुनिया नेला थोर मांडिले निर्वाण ।
घायातळी राम उभा करुनियां म्हणतसे करी रे स्मरण ॥१॥
जगाच्या संकटीं रामाते स्मरती राम स्मरावें कवण॥धृ०॥
देवांचे मरण भक्तें चुकविलें म्हणोनि अमर केला हनुमंतु ।
न तुटे न जळे न बुदे न ढळे संसारी असोनी अलिप्तु ॥२॥
दुसरेनि अवतारें रामासी जन्मु परी हनुमंत जन्मातीतु ।
देवासी जन्ममरण दिसते अविनासी । एका जनार्दनी केले भक्तु रे या ॥३॥
