वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › ११, घोंगडी अभंग ९३९ ते ९५५

अद्वैत पेठेहुनी घोंग

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074710 · अभंग क्र. ९४७

947.
अद्वैत पेठेहुनी घोंगडे आणिले ।
अमोलिक घेतले पंढरिये ॥१॥
चौ हातांची भरणी आली ।
तिये चराचरी ऐसे नाही ॥२॥
रखुमादेविवरू विठ्ठली नीट ।
पांघुरविले वैकुंठ मज देखा ॥३॥

अर्थ :
अद्वैताच्या बाजारांतून हे परमात्मरूपी अमोलिक आणलेले घोंगडे आम्ही पंढरीस घेतले. हे लांबी रुंदीला परिपूर्ण असून असे दुसरे घोंगडे चराचरांत नाही. या रखुमाईचे पती श्रीविठ्ठलानी मला हे घोगडे नीटपणे पांघरविले आहे. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग