वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › ११, घोंगडी अभंग ९३९ ते ९५५

निरालंब घोंगडे अद्वै

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074711 · अभंग क्र. ९४६

946.
निरालंब घोंगडे अद्वैत पेठे ।
तेथ एक भेटे रूपेंवीणे ॥१॥
हिरोनि घेतले हिरोनि घेतले ।
मज पै दिधले दोषेंवीण ॥२॥
रखुमादेविवरे कामाण केले ।
अपकारेंविण उघडे नागविले ॥३॥

अर्थ :
निरालंबाच्या ठिकाणी एक अद्वैत पेठ आहे. तेथे अमोलिक एक रूपरहित घोंगडे असून ते मला पंढरीस मिळाले. माझे सर्वस्व हरण करून घेऊन कोणताही उद्देश न ठेवता ते घोंगडे मला दिले. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल यांनी हे उत्तम कमविलेले घोंगडे मला दिले खरे पण काही एक अपकार न करिता माझी अनात्मभावापासून नागवण केली. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग