राम सहवास - अभंग ९३७
937.
राम सहवास - अभंग ९३७ ते ९४४
कौसल्या यज्ञशे सेउनी राम जन्मला तियेचें पोटी । वनवासासी जाता वियोग पावली दुःख शोकें हिंपुटी ॥१॥
धन्य धन्य ते अहिल्या शिळा । हरीच्या पावली चरणकमळा ॥धृ.॥
त्र्यंबकभजनी जानकी पर्णिली । केली एक पतिव्रता रणी । रामा वेगळी रावणे चोरुनियां नेली । दुःखीत अशोक वनी ॥२॥
रामे रणांगणी राक्षस मारिले । ते मरणातीत होऊनि ठेले । देवांची बंधने तोडिली रामे । शेखी अमर ते प्रळयी निमाले ॥३॥
दशरथ पिता निमाला । त्याचे कलेवर पचे तैल द्रौणीं । सकुळी अयोध्या वैकुंठासी । नेली अभिनव श्रीरामकरणीं ॥४॥
सुरांचा कैवारी कीम असुरांचा वैरी । ऐसे न मानीच रामरावो । वैरियांचा बंधु बिभीषण आप्तु । एका जनार्दनी समभावो ॥५॥
