वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

सुवर्णाचे तांट वोगरु

🙏 4. संत नामदेव · ABH-081613 · अभंग क्र. ९४३

943.
सुवर्णाचे तांट वोगरुनी परिकर | रुक्माईने सत्वर आणियेले ॥१॥
कनक कळस घेऊनि सत्यभामा आली | आपोहन घाली देवराया ॥२॥
|सुखाचा सुरतरू भक्त चिंतामणी | पुरवितो आयणी निजभक्ताची ॥३॥
तेथे उद्धव अक्रूर नारद तुंबर | आणिक अपार भक्त येती ॥४॥
महाद्वारी होता उभा नामा ठेला | तो जवळी वोलाविला केशिराजे ॥५॥
देवाचा वोरसु देखोनी गोरव | देही देहभाव व्सिरला ॥६॥
निजबोध निवृत्ति राहिली निवांत | हृदयी वोसंडित प्रेमरसे ॥७॥
देखोनि पंढरीनाथ धाविन्लला वेगी | जैसी वत्सालागी तान्हे धेनू ॥८॥
उचलोनि चहुंभुजी दिले आलिंगन | आणिले उमजून देहावरी ॥९॥
धरोनि बाहुवटी बसविला तांटी | स्फुंदता हिपुटी होते असे ॥१०॥
कुर्वाळोनि माथा घास घाली मुखी | तंव तो परलक्षी तन्मय होतु ॥११॥
अंतरींचे गुज बोले कृपासिंधु | करूनि सावधु नामयासी ॥१२॥
म्हणे जिवलगा बोले सुख गोष्टी | आत आहे पोटी बहु दिवसांचे ॥१३॥
अंतरींचे सुख बाहेरी तू पाहे | गगना काय आहे पाठीपोट ॥१४॥
तैसा तू आनंदु आहे. पै निर्मळ | चिद्रूप केवळ सदोदित ॥१५॥
तुझे तेंचि माझे माझे तेंचि तुझे | आहे सहजी सहजे एकविध ॥१६॥
परतोनिया दृष्टि घाली मजवरी | मी तो निरंतरी तूंचि होसी ॥१७॥
हा तुझा सोहळा पाहे उघडा डोळा | मी आहे तुज जवळा ज्ञानदीपू ॥१८॥
आर्त तुझिंये भेटी आहे भक्तराणे | सुखाचे पारणे करवी त्यांसी ॥१९॥
परमानंद मूर्ति धन्य: हा निवृत्ति | सुखांचा सांगाती ज्ञानंदेव ॥२०॥
पवित्र हा सोपान परलोकींच तारु | करी याचा आदरू भाग्यवंता ॥२१॥
म्हणोनि पंढरीनांथे आश्वासिले करे | मिठी दिली येरे चरणकमळी |॥२२॥
नामा म्हणे तुझे कृपेचा वोल्हावा | विश्रांती या जिवा जाली असे ॥२३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग