एकलेचि यावे एकलेचि ज
947.
एकलेचि यावे एकलेचि जावे ।
जोडिले नये सवे देखती सर्व ॥१॥
परि या मायाभ्रमे कैसा केला गुंता ।
न पुरती संचिता भोगिता भोगा ॥२॥
पुन्हा जन्म पुन्हा मरणाचि सांगती ।
यमदंड पावती गर्भवास ॥३॥
निळा म्हणे नये विकृति कंटाळा ।
टोके जेवि कावळा वमनासाठी ॥४॥
