वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

तंव म्हणती द्विज परि

🙏 4. संत नामदेव · ABH-081585 · अभंग क्र. ९५१

951.
तंव म्हणती द्विज परियेसी गुणनिधी | प्रतिपादिले वेदी जेजे धर्म॥१॥
ते ते आचरावे विहित क्रियाकर्म | जे जे वर्णाश्रमे आले जया ॥२॥
तेचि एक धन्य जगी देहधारी | असता संसारी जीवन्मुक्त ॥३॥
आचार प्रथम ब्राह्मणांचा धर्म | शौच नित्यनेम सत्यवाणी ॥४॥
तप शम दम भूतदया पूर्ण | अखंड अनुसंधान स्वस्वरूपी ॥५॥
स्नानसंध्या जप होम अध्ययन विधि | देवतार्चन सिद्धि करुनी भावे ॥६॥
वैश्वदेव आणि अतिथीपूजन | नववे ब्रह्मयज्ञ आवदयक ॥७॥
संपादुनि हे विधि सारावे भोजन | त्यावरी श्रवण पुराणांचे ॥८॥
सर्व॑ काळ व्हावे संतुष्ट मानस | असावा विश्वास वेदवचनी ॥९॥
|तुम्ही तंव सर्वज्ञ संपन्न चतुर | देखावा विचार विशुद्धीचा ॥१०॥
सांडुनि अभिमान व्हावे शुद्धमती | जोडावी ते कीर्ति उभय लोकी ॥११॥
जावे चंद्रभागे करावे मंत्रस्नान | द्यावे हेमदान सत्वशुद्धी ॥१२॥
|पुण्यजना एकी क्षेत्रप्रदक्षिणा | करावी पावन उभयकुळे ॥१३॥
ऐकोनि पंढरिरावो बोलते जाले वाचा | आज्ञा ते शिरसा स्वामियांची ॥१४॥
परी काया वाचा मने मागेन ते द्यावे | माझ्या सांभाळावे नामयासी ॥१५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग