वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

तंव अणिमादि सिद्धि उ

🙏 4. संत नामदेव · ABH-081591 · अभंग क्र. ९४०

940.
तंव अणिमादि सिद्धि उभ्या महाद्वारी | तिही सर्व सामोग्री सिद्ध केली ॥१॥
सडा संमार्जने गुढिया तोरणे | शृंगारिली भुवने परिचारिकी ॥२॥
म्हणती काय पुण्य केले येणे विष्णुदासे | देवा लोभ पिसे लावियेले ॥३॥
द्वारी दिपावळी चौकरंग माळा | अभिनव सोहळा आरंभिला ॥४॥
हरुषे मंगळ तुरे वाजती विनोदे | भक्त जयजय शब्दे गर्जताती ॥५॥
मंगळ मार्जन नामयाते करविले | मग ते आरंभिले पुण्याहवाचन ॥६॥
देवे अंगवस्त्रे आपुलेनी हाते | वाहिली अनंते विष्णुदासा ॥७॥
सत्यभामा राही रुकमाई जननी | वेगी अक्षवाणी घेऊनि येती ॥८॥
आनंदे नरनारी कवतुक पाहती | जीवे ओवाळिती नामयासी ॥९॥
|आपुलिया दासाचा करी समारंभु | दीनानाथ प्रभु कृपासिंधु ॥१०॥
धन्य हा नामा म्हणती सकळ लोक | नेणती याचे सुख ब्रह्मादिक ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग