भिल्लिण - अभंग ९३४
934.
भिल्लिण - अभंग ९३४
भिल्लिणी बाळा वनी वेंचिता फळा । देखिला रामरावो ठक पाडिलें डोळा ॥१॥
गोडणी सोहंमार्गी गीती गाती रामा । आनंदें नाचती दृष्टी देखोनी रामा ॥२॥
देखोनी रामरावो कैसा झाला भावो । सेविता कंदमुळें आम्हा दिसतो देवो ॥३॥
सफळिता तरुवरी साचे राम आभासे । पहा जनी वनी अवघा रामचि दिसे ॥४॥
चारा हरवेठीं बोरा भरुनिया पाटी । फळामाजीं फळ राम सफळीत दृष्टी ॥५॥
आसनी शयनी आम्हा आणीक बोधु । एका जनार्दनी गोड लाविला वेधू ॥६॥
