वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › १०, पाईक अभंग ९३३ ते ९३८

एकुची एकला जाला पै द

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074723 · अभंग क्र. ९३४

934.
एकुची एकला जाला पै दुसरा ।
एकीमेकी सुंदरा खेळविती ॥१॥
माझीये कडीये तान्हा तुझीये कडीये कान्हा ।
देवकी यशोदा विस्मो करिती मना ॥२॥
बापरखुमादेविवरू आवडे मना ।
जगत्रजिवनु कान्हा बाईयांनो ॥३॥

अर्थ :
सत् चित् आनंद या रूपाने श्रीकृष्ण परमात्मा एकटा एकच असता आपल्या दोन्ही मातेस आनंद देण्याकरिता आपण दुसरा झाला. त्या दोघींनी दोघा कृष्णास कडेवर घेऊन खेळवू लागल्या. आणि मोठ्या आश्चर्याने एकमेकीस म्हणतात की आज माझ्या कडेवर तान्हा आणि तुझ्या कडेवरही कान्हा काय चमत्कार आहे हा. माझे पिता व रखुमादेवीवर जे त्रैलोक्याचे जीवन आहेत ते श्रीकृष्ण आम्हांस आवडतात अशा त्या दोघी एकमेकीस म्हणत आहेत. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग