केशवा म्हणे नाम्या ध
936.
केशवा म्हणे नाम्या धन्य तुज फावले | बरवे तुवा केले आत्महित ॥१॥
पुण्यपावन तीर्थे पाहिली सकळीक | प्रक्षाळीली पातके वासनेची ॥२॥
धन्य तुवा केले जन्मोनि सार्थक | शोक मोह दुःख निवारिले ॥३॥
तीर्थयात्रा सफल व्हावया संपूर्ण | करी का उद्यापन विधियुक्त ॥४॥
केलिया कष्टाचे होईल सार्थक | सांगेन ते ऐक वचन माझे ॥५॥
महा मुक्तिक्षेत्र वैकुंठ महीवरी | विख्यात पंढरी भूवैकुंठ ॥६॥
एक शीत अन्न अर्पे द्विजामुखी | राहे सदा सुखी कल्पवरी ॥७॥
क्षेत्रवासी भावे पूजावे ब्राह्मण | षड्रस भोजन द्यावे त्यांसी ॥८॥
सुगंध चंदन सुमन तुळसीमाळा | समर्पि तांबुला सदक्षिणा ॥९॥
ऐसे बोलोनिया देवे नामा धरियेला करी | राउळाभीतरी घेऊनि गेले ॥१०॥
मग रुक्माईसी सांगे वैकुंठीचा राणा | आजी आराधना नामयाची ॥११॥
