वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

महा मुक्ति क्षेत्र त

🙏 4. संत नामदेव · ABH-081575 · अभंग क्र. ९४९

949.
महा मुक्ति क्षेत्र तीर्थाचे तारक | उपमेसि आणीक नाही दुजे ॥१॥
ते हे पंढरपूर प्रेमाचे भांडार | नामे निरंतर गर्जंतसे ॥२॥
येवढ तीर्थ जवळी असता पै समर्थ | कोण भाग्यहत दैन्य भाकी ॥३॥
जीवन्मुक्त ज्ञानी येथे पुंडलिक मुनि | बैसलासे ध्यानी परलक्षी ॥४॥
योग्यांचे हृदयींचे निजध्यान नेटके | ते जयाचेनि सुखे वेडावले ॥५॥
पुण्यपावन भीमा दक्षिणवाहिनी | अमृत संजीवनी पुण्यराशी ॥६॥
आनंदरसकूपिका प्रत्यक्ष चंद्रभागा | दर्शने न या गा गर्भवासा ॥७॥
स्वर्गी मंदाकिनी लाजोनि राहिली | पाताळी प्रवेशली भोगावती ॥८॥
सहस्त्रभाग भेणे होउनी भागीरथी | सागरा मिळती जाली वेगी ॥९॥
भक्तजन भाग्याची की सुख आरोग्याची | जे का वैराग्याची जन्मभूमी ॥१०॥
तेथे हरिखे निर्भर नामा संतांचे संगती | गीती गाय कीर्ति विठोबाची ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग