वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › २. सार्थ अभंग ५०१ ते १०००

आशा तृष्णा माया अपमा

🙏 3. संत तुकाराम · ABH-078797 · अभंग क्र. ९४९

949.
आशा तृष्णा माया अपमानाचे बीज । नासिलिया पूज्य होईजेते ॥१॥
अधीरासी नाही चालो जाता मान । दुर्लभ दर्शन धीर त्याचे ॥२॥
तुका म्हणे नाही आणिकासी बोल । वाया जाय मोल बुद्धीपाशी ॥३॥

अर्थ :
आशा तृष्णा माया हे अपमानाचे बीज आहेत यांना जर नष्ट केले तर मनुष्य पूज्य होतो. त्यांचा त्याग केला नाही तर कोठेही मान मिळत नाही व ज्याने यांचा त्याग केला तो धीर समजून त्याचे दर्शन दुर्लभ आहे असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात जो बुद्धिवान आहे त्याना उपदेश लगेच समजतो व जे अज्ञानी लोक आहे त्यांच्या ठिकाणी बोलणे व्यर्थच होयअर्थातच त्यांची बुद्धीच अल्प असते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग