वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › ११, घोंगडी अभंग ९३९ ते ९५५

ब्रह्माचा गोंडा चहू

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074701 · अभंग क्र. ९५०

950.
ब्रह्माचा गोंडा चहू पावला ।
मन पांघुरे उमप भावा ॥१॥
चौ हातांहून आगळे ।
द्विकारांहूनि वेगळे गे माये ॥२॥
बापरखुमादेविवरे सुभटे ।
मज चवाळे दिधले गोमटे गे माये ॥३॥

अर्थ :
या घोंगड्याला ब्रह्मज्ञानाचा गोंडा लावला असून तो चवथ्या पुरूषार्थाला कारण झाला. त्यामुळे अमर्यादित भावाने भटकणाऱ्या मनाला पांघरविले आहे. ते चार हाताहून अधिक आहे म्हणजे चतुर्भुज विष्णुहून वेगळे आहे. तसेच दोन हातांच्या मानवाहून ही वेगळे आहे. अशा तऱ्हेचे हे सुंदर घोंगडे रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याने मला पांघरण्यास दिले. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग