वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › ११, घोंगडी अभंग ९३९ ते ९५५

चवळ्याची सांगेन मातु

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074706 · अभंग क्र. ९५१

951.
चवळ्याची सांगेन मातु ।
चवाळे पांघुरे पंढरीनाथु ॥१॥
गोधने चारिता हरि पांघुरला ।
मज चवळ्याचा त्यागु पै दिधला ॥२॥
बापरखुमादेविवरू श्रीगुरूराणा ।
चवाळे पांघुरवी निरंजना गे माय ॥३॥

अर्थ :
या परमात्मबोधरूपी घोंगड्याची गोष्ट अशी आहे की, हे घोंगडे एक पांडुरूगरायच पांघरत असतो. भगवंताने हे घोंगडे गाई चारत असता पांघरले होते. मला मात्र प्रथमच त्याने हे चवाळे पांघरण्यास दिले. म्हणजे परमात्मबोध प्रथमच दिला. नंतर ते घोंगडे त्या श्रीकृष्णाने माझ्याकडून काढून घेतले. म्हणजे मला परमात्मबोध झाला आहे. अशा तऱ्हेचा माझ्या ठिकाणचा अभिमानही काढून टाकला. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तेच सद्गुरू असून त्यांने एकांतामध्ये मला हे बोधरूपी घोंगडे पांघरण्यास दिले. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग