वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १६. मनास व जनांस उपदेश

उत्तम अधम जया जे संग

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089029 · अभंग क्र. ९४६

946.
उत्तम अधम जया जे संगती ।
तैसी त्याचि मति फांको लागे ॥१॥
सज्जना संगती धर्मक्रिया वाढे ।
पापीया आवडे पापबुध्दि ॥२॥
म्हणोनि जैसिया तैसा झाला हरी ।
भक्ता मित्र वैरी निंदक खळा ॥३॥
निळा म्हणे जाणे अंतरीचां भाव ।
तया तैसा देव फळदाता ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग