वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › ११, घोंगडी अभंग ९३९ ते ९५५

रात्री दिवस वाहातसे

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074708 · अभंग क्र. ९४०

940.
रात्री दिवस वाहातसे चिंता ।
केशव धडौता होईन मी ॥१॥
खिरजट घोंगडे फाटके ते कैसे ।
वेंचिले तैसे भोगिजेगा ॥२॥
वित्त नाही गांठी जीवित्वा आटी ।
उघडी पाठी हींव वाजे ॥३॥
घोंगडे देईल तो एक दाता ।
रखुमादेविवरा मागो रे आता ॥४॥

अर्थ :
रात्रंदिवस मनांत चिंता वाहतो की सर्वत्र परिपूर्ण जो परमात्मा केशव तोच मी होईन. तसा झालो म्हणजे खिरजट म्हणजे घाणेरडे देहात्मभावाचे फाटके घोंगडे ते कसे राहणार ? त्याचा नाश (बाध) झाला असता त्या केशवरूप धड घोंगड्याचा मी भोग घेईन. उत्तम घोंगडे घेण्यास साधन संपत्ती च नसली तर जीवाला फार कष्ट भोगावे लागतात. कारण चांगले घोंगडे नसल्यामुळे उघडा देहात्मभाव असतो त्यामुळे कष्टरूपी थंडी फार वाजते. याकरता बाह्यप्रवृत्ति टाकून मन मागे फिरले तर ते रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल मोठे दाता असल्यामुळे ऐक्यभावाचे घोंगडे देईल. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग