वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 53. राम रावण युद्ध - अभंग ९३२ ते ९३३

राम रावण रणांगणी । य

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085156 · अभंग क्र. ९३३

933.
राम रावण रणांगणी । युद्धा मीनला नीज निर्वाणीं । येरयेराते लक्षुणी । स्वये विधों पाहे ॥१॥
तंव गज ध्वजीं राम । रामाचि धनुष्यबाण । रामरुप आपण । आपणा देखे ॥२॥
रावणा पाडलें ठक । रामरुप कटक । पारिकें आणीक । तया न दिसे कांही ॥३॥
रामरुप नर । रामरुप वानर । वैरी निशाचर । रामरुप ॥४॥
रावण पाहे लंकेकडे । रामरुप लंकेचे हुडे । सबाह्म चहूकडे । राम दिसे ॥५॥
ऐसे निर्वाण युद्ध । विसरला द्वंद्वभेद । एका जनार्दनी आनंद प्रगटला ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग