वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

मग केशव म्हणे माझे प

🙏 4. संत नामदेव · ABH-081601 · अभंग क्र. ९४८

948.
मग केशव म्हणे माझे परिसा वचन | गुज मी सांगेन अंतरीचे ॥१॥
व्रत तप दान सकळ कर्मक्रिया | एक भूतदया असे जेथे ॥२॥
तोचि सत्य मानी भक्त आणि ज्ञानी | न विसंबे निर्वाणी जीवे त्यासी ॥३॥
ज्ञानाचे सौभाग्य भक्ति आणि वैराग्य | तयाचे आरोग्य प्रेमरस ॥४॥
|त्यासी संजीवनु संदा संत संगू | त्यावरी अनुरागू वज्रकवच ॥५॥
धर्मअर्थकाममोक्ष दृष्टि नाणी | वोळगती आंगणी मुक्ति चारी ॥६॥
अनुहात गजरू होतसे नामाचा | दीप अलक्षाचा पाजळितु ॥७॥
|इंद्रपदादिके नाशिवंत होती | म्हणोनि आसक्ती न धरावी त्यांची ॥८॥
है जाणोनि साच न धरावी त्यांची आस | अखंड माझा वास हृदयी त्यांच्या ॥९॥
कामक्रोध वैरी दुराविले दुरी | मज हृदयमंदिरी सांठदिले ॥१०॥
तेणे त्याच्या उच्छिष्टा जालोसे अधिकारी | ब्रह्मरसा सरी न पवी जेथे ॥११॥
म्हणोनि ये संसारी धन्य एक नामा | जेणे माझा प्रेमा अनुभविला ॥१२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग