भोळा कर्पुरगौर भोळे
946.
भोळा कर्पुरगौर भोळे ज्याचे मन । भोळ्या भक्ताधीन धांवेक भोळा ॥१॥
भोळे याचे गळा शोभे रुडमाळा । अर्धांगी ते बाळा पर्वताची ॥२॥
भोळें ज्याचे मन भोळे ज्यांचें ध्यान । भोळे ज्याचे वदन शोभतसे ॥३॥
एका जनार्दनी प्रेमाचा पुतळा । भरो माझे डोळा सदोदित ॥४॥
