आणिक पाईक मोलाचे तुझ
936.
आणिक पाईक मोलाचे तुझे ।
तैसे नव्हे माझे पाईकपण ॥१॥
न मगे वही मोल जीवन भाते ।
ते द्यावे माते पाईकपण ॥२॥
बापरखुमादेविवरा गोसांविया ।
पाईकपण मी पाया जोडलेती ॥३॥
अर्थ :
हे श्रीविठ्ठला मोल घेऊन तुझी सेवा करणारे पुष्कळ सेवक असतील. परंतु मी मात्र तसा सेवक नव्हे. मी तुझ्याजवळ इनाम मागत नाही पगार मागत नाही. किंवा निर्वाहाला सुद्धा काही मागत नाही. फक्त मला सेवकपणा द्यावा एवढेच मागणे आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठली तुमची प्राप्ती अशा पाईकपणानेच मला झाली. असे माऊली सांगतात.
