वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

सकाम निष्काम वाचे जप

🙏 4. संत नामदेव · ABH-081605 · अभंग क्र. ९५०

950.
सकाम निष्काम वाचे जपे नाम | ती माझा परम प्राणसखा ॥१॥
जीवाहूनि आवडता न करी जीवापरता | पूजी परम देवता भावे त्यासी ॥२॥
हे माझी प्रसिद्धि जगी ब्रीदावळी | हरिदासाचे कुळी वोळंगे सदा ॥३॥
जन्मोनि ज्याचे कुळी एक हरिदास | धन्य त्याचा वंश पुण्यशीळ ॥॥४॥
काया वाचा मने न विसंबे त्यासी | ते माझ्या दैवासी दैव जाले ॥५॥
नामधारकाचे उच्छिष्ट जेथे पडे | उभा राहोनि पुढे झेली मुख ॥६॥
ते मज गोमटे सेविता सुख वाटे | म्हणोनि धाटे मोठे शरीर माझे ॥७॥
बहु कांति पुष्टि यश कीर्ति प्रभा | नित्य नवी शोभा होय तेणे ॥८॥
ते संत सोयरे भेटती जे वेळी | ते माझी दिवाळी दसरा सण ॥९॥
म्हणोनी नामयाते जेवविले सांगाते | बहु दिवस होते आत पोटी ॥१०॥
जाले ते सर्वथा नोहे पै अन्यथा | पुढती सांगा आता काय करणे ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग