वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 113. संसार - अभंग ३०८३ ते ३१७७

जगाची ती रहाटी । जैश

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085306 · अभंग क्र. ३१४७

3147.
जगाची ती रहाटी । जैशी अंधाहातीं दिली काठी । चिखलाची पाउती । काय मार्ग दिसे ॥१॥
तैसे भुलोनिया जन । गेले म्हणती माझे जाण । बा कवणाचें कवण । कामा न ये शेवटी ॥२॥
चालतो पाहतो ऐकतो कानी । दुजियाचे गुणदोश मनी । नका आणू चुकवा पतनी । पुढील पेणे अंतरू नका ॥३॥
हेंचि बोधाचे लक्षण । धरा हृदयी याची खुण । शरण एका जनार्दन । वारंवार विनवितसे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग