वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

मागे बहुत झाले खेळ ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-080518 · अभंग क्र. ३१२५

3125.
मागे बहुत झाले खेळ । आता बळ वोसरले ॥१॥
हालो नये चालो आता । घट रिता पोकळ ॥धृपद॥
भाजल्याची दिसे घडी । पट ओढी न साहे ॥२॥
तुका म्हणे पाहता घडी । जगा जोडी अंगारा ॥३॥

अर्थ :
मी मागे खूप प्रपंचाचे खेळ खेळलो परंतू आता देहाभिमानाचे बळच माझ्यामधून ओसरले आहे. आता मला स्वरुप स्थिती प्राप्त झालेली आहे आणि जो देहरुपी घट आहे तो आता पूर्णपणे मोकळा झालेला आहे जळालेल्या वस्त्राची घडी जशीच्या तशी तर राहातेच परंतू त्याला थोडा जरी हात लावला की, त्याची घडी लगेच मोडते. तुकाराम महाराज म्हणतात, जळालेल्या वस्त्राची जर आपण घडी पाहण्यास गेलो ते हातात घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या हातामधे केवळ राख येते त्याप्रमाणे माझा देह तुम्हाला जरी दिसत असला तरी आता माझा देहरुपी पूर्णपणे मोकळा झालेला आहे वृत्तीशून्य झालेला आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग