वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

अन्यायासी राजा न करि

🙏 3. संत तुकाराम · ABH-080673 · अभंग क्र. ३१५९

3159.
अन्यायासी राजा न करिता दंड । बहुत ते लंड पीडी जना ॥१॥
न करिता निगा न काढिता तन । कैची येती कण हातासी ते ॥धृपद॥
तुका म्हणे संता करू नये अनृत । पाप नाही नित विचारिता ॥२॥

अर्थ :
अन्याय करणाऱ्या लोकांना जर राजाने दंड केला नाही तर ते दुष्ट लोक सामान्य लोकांना फार त्रास देतील. अहो पीक पेरले तर त्याची निगा ठेवली नाही आणि त्याच्यातील तण जर काढले नाही तर हातामध्ये धान्य येईल कसे ? तुकाराम महाराज म्हणतात, राजा कितीही बलाढय असो परंतू संतांवर खोटा आरोप ठेवून संतांना दंड किंवा शिक्षा करु नये आणि जो खरच अन्यायी असेल पापी असेल त्याला देहृदंडाची जरी शिक्षा देण्याची वेळ आली तरी दयावी याचे राजाला कोणत्याही प्रकारचे पाप लागणार नाही याउलट राजाने त्या अन्यायी व पापी मनुष्याला दंड दिला नाही तर राजाच पापी ठरतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग