वैर करुनी मन मारावें
3151.
वैर करुनी मन मारावें । मनाधीन पै न व्हावे ॥१॥
मनामार्ग जाऊ नये । मन आकळुनी मन पाहे ॥२॥
मन म्हणे ते न करावे । मनी मनासी बांधावें ॥३॥
मन म्हणेल ते सुख । परी पाहता अवघे दुःख ॥४॥
एका जनार्दनी मन । दृढ ठेवावें आकळून ॥५॥